
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत चालली आहे. सासरच्या आणि पतीच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. मात्र महिला आयोगाने या प्रकरणी वेळीच लक्ष घातले नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, “रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय. त्यांच्या बोलण्यात चिल्लर वैगरे असे शब्द यायला लागले आहेत. आपण एक महिला आहोत. जेव्हा अशी संवेदनशील एखादी घटना घडते, तेव्हा आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं, अशा महिलेचा राजीनामा मागू नये तर, राजीनामा घ्या. तसेच सुसंस्कृत चांगली महिला त्या पदावर बसावा.”
महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, रोहित पवारांची रुपाली चाकणकरांवर टीका