
बँक कर्मचारी असल्याचे भासवत वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला पवई पोलिसांनी अटक केली. गौरव भाटिया असे त्याचे नाव आहे. तक्रादार हे ज्येष्ठ नागरिक असून ते पवई परिसरात राहतात. जानेवारीमध्ये एकाने त्यांना फोन केला होता. त्याने बँकेत काम करत असल्याचे भासवत 22 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. चांगला परतावा मिळेल या हेतूने त्याने गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यासाठी त्याने तक्रारदार यांच्याकडून कोरे चेक घेऊन त्यांच्या खात्यातून 27 लाख 37 हजार रुपये काढले गेल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली.




























































