Mumbai News – बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, मग पोलिसांसमोर कबुली, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालाड येथे भयंकर घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रियकराची हत्या करून भावाने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नितीन सोलंकी असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे तर आशिष शेट्टी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आशिषला अटक केली असून त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आशिषच्या बहिणीचे नितीनसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी नितिनने आशिषच्या आई आणि बहिणीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. याचा राग मनात धरून आशिषने शनिवारी रात्री नितीनला जोगेश्वरीला भेटला. तेथे दोघे दारु प्यायले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आशिषने नितीनला मालवणीतील कोळीवाड्यात एका खोलीत नेले. तेथे नितीनला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

नितिनला मारल्यानंतर आशिषने स्वतः मालवणी पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नितिनला शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी नितीनविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.