
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जप्त केलेली स्पह्टकांनी भरलेली स्कॉर्पिओ तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे आरोपांचा मसुदा सादर केला. हा मसुदा म्हणजे ‘एनआयए’ने फौजदारी खटला सुरू करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल मानले जात आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध तपास यंत्रणेने गुन्हा नोंदवलेल्या कोणत्या कलमांखाली आरोप निश्चित केला जाऊ शकतो, याचा निर्णय विशेष न्यायालय घेणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जूनला होणार आहे. अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्पह्टकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. त्यामागे दहशतवादी कट-कारस्थान असल्याचे उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.
























































