कंगना आणि रंगोलीची चौकशी होणार, 10 नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही चौकशी केली जाणार आहे. 10 नोव्हेंबरपूर्वी चौकशीसाठी हजर राहावे असे पोलिसांनी म्हटले आहे.

द्वेषपूर्ण पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्याचे प्रकरण
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना राणावत अडचणीत येण्याची आहे. एखाद्या समाजाबद्दल सोशल मीडियावर द्वेषपूर्ण व अवमानकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची चौकशी करा असे आदेश मेट्रोपोलिटीन कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. एवढेच नव्हे तर हा चौकशी अहवाल 5 डिसेंबरपर्यंत कोर्टात सादर करा असेही न्यायाधीश भागवत झिरपे यांनी बजावले होते.

अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
एका विशिष्ट समाजाबद्दल रंगोली हिने द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते याबाबत अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी केवळ सोशल मीडियावरील तिची सेवा खंडित केली व त्या व्यतिरिक्त तिच्यावर काहीच कारवाई केली नाही तर आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनाने एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता. या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपीची यात नेमकी भूमिका काय होती हे कळणे गरजेचे असल्याने अहवाल सादर करावा असा आदेशही न्यायालयाने दिला होता.