
बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत हीने मोजक्याच मित्रमैत्रिणींसोबत 25 नोव्हेंबरला आपला बर्थडे सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनचे व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या चाहत्यांनीही तिला भरभरून शुभेच्छा दिला. पण या सेलिब्रेशनमध्ये राखीचा पती रितेश मात्र कुठेही दिसला नाही. यामुळे राखीने खरंच लग्न केले आहे की नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
बर्थडे सेलिब्रेशनच्या या व्हिडीओमध्ये राखीने फुल ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. तिच्या समोर एक तरुण हातात केक घेऊन उभा आहे. तर राखीचे मित्रमैत्रीण तिला लांबूनच केकवरील मेणबत्या विझवण्यास सांगत असून तिला एक इच्छा व्यक्त करण्यास सांगत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पण या सगळ्यांमध्ये राखी ज्याचे सतत नाव घेत असते तो तिचा पती रितेश मात्र कुठेही दिसत नाहीये. यामुळे राखीचे चाहतेही चक्रावले आहेत. कारण राखीचा पती तिचा बर्थडे कसा चुकवू शकतो. असा प्रश्नच चाहत्यांना पडला आहे.


























































