
मुंबईत आज एकाच दिवसात 43 गोवर संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण संशयितांचा आकडा 4 हजार 979 वर पोहोचला. तर आज एकही रुग्ण सापडला नसल्याने बाधित रुग्णांची संख्या 462 वर स्थिर राहिली.
मुंबईत गोवरचा प्रसार झपाटयाने होत आहे. मुंबईत भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी दिवसभरात 43 रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 34 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 82 लाख 7 हजार 414 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आढळणारे संशयित आणि बाधितांवर आवश्यक उपचार करण्यात आले.























































