
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असणारे ’होऊ द्या चर्चा’ मोहीम ही देशातील एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे. सरकारच्या निव्वळ घोषणाबाजी आणि इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल लोकांच्या मनात प्रचंड खदखद असून त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी शिवसेनेने ही मोहीम आखली, असे उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सांगितले. शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी येथे आयोजित संवाद सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.
‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेच्या शाहूवाडी तालुक्यातील दुसऱया दिवशी वरेवाडी, नांदगाव, पेंडागळे, सावे, पिशवी, शित्तूर तर्फ मलकापूर येथे लोकांच्या मोठया प्रतिसादात संवाद सभा संपन्न झाल्या. सर्वसामान्य जनतेच्या मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी मनाला येतील ती आश्वासने द्यायची, मोठ-मोठय़ा घोषणा करायच्या. लोकांना योजनांच्या मखमली नावाने गुमराह करायचे आणि सत्ता आली की आपला कारभार वाट्टेल तसा करायचा हा धंदा देशात व राज्यात सुरू आहे. निरनिराळ्या योजना व सुविधा देऊ, असे सांगून लोकांना किचकट प्रशासकीय बाबींची अडचण निर्माण करून त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायला लावायचं एवढा एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱयांच्या माध्यमातून सुरू असल्याची बोचरी टीकाही ज्योती ठाकरे यांनी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम, महिला आघाडीच्या अलका भालेकर, दीप्ती कोळेकर, पूनम भोसले, विजय लाटकर, दिनकर लोहार यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ईशान्य मुंबई
ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 चे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 124 च्या वतीने उपविभागप्रमुख सुनील मोरे, शाखाप्रमुख संतोष सवने यांच्या नेतृत्वाखाली विभागात ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी शेवाळे, भारती गायकवाड, विनाली पांचाळ, संगीता तुळसकर, श्रुती खोपकर, सागर फुलसुंदर, संतोष तुळसकर, श्रीकांत चिंचपुरे, राजेंद्र पेडणेकर,यशवंत खोपकर, विनायक जाधव, प्रकाश कुष्टे, विजय शिरोडकर, विलास दळवी, विलास राऊत, मनोरमा कोटियन, दुर्गा लादे, कविता शिरोडकर, छाया वागणे, मनीषा पाटोळे, सावित्री जाधव, श्रद्धा केशीकर, भारती सावंत आदी उपस्थित होते.
माहीम
माहीम येथे झालेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, विभागप्रमुख महेश सावंत, विधानसभा संघटक राजू पाटणकर, उपविभागप्रमुख अभय तामोरे, शाखाप्रमुख विनायक आक्रे, शिवसेना महिला शाखा संघटक शकुंतला मेहेर, काँग्रेस माहीम ब्लॉक अध्यक्ष मुबारक शहा, 182 माहीम अध्यक्ष, काँग्रेस किशोर तामोरे, धारावी शिवसेना नगरसेवक टी. एम. जगदीश आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील वरोरा-भद्रावती विधानसभेतील वरोरा तालुक्यातील शेंबड या ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ मोहीम राबवण्यात आली. शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, तालुकाप्रमुख बिपिन काकडे, शहरप्रमुख संदीप मेश्राम, उपशहरप्रमुख मनीष दोहतरे, युवासेना जिल्हा समन्वयक दिनेश यादव, शेंबडचे सरपंच बालाजी जिवतोडे तसेच युवासेना, अन्य अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, भायखळा सहसंघटक सूर्यकांत पाटील, युवासेना मुंबई समन्वयक अमित जाधव व चंद्रपूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दहिसर
मुंबईतील शाखा क्रमांक 5, दहिसर, संभाजीनगर येथे ‘होऊ द्या चर्चा’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संजय घाडी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधानसभाप्रमुख अशोक महामुणकर, ऍण्ड. अनिता डहाळे, ज्येष्ठ शिवसैनिक घनश्याम सोंडकर, महिला शाखा संघटक पूजा गावडे, शाखाप्रमुख संदीप शेलार उपस्थित होते. यावेळी संजय घाडी यांच्या प्रयत्नाने संभाजीनगर ते न्यू वनश्री हाऊसिंग सोसायटी येथपर्यंतच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
























































