एनएससीआय क्लबच्या बेसमेंटमध्ये उपकंत्राटदाराची आत्महत्या

प्रातिनिधिक

वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया क्लबच्या बेसमेंटमध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. राजेश तावडे असे त्यांचे नाव होते. कामाचे पैसे न मिळाल्याने आलेल्या नैराशातून तावडे यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहली असून त्यात आपल्या मृत्युस जबाबदार असलेल्यांची नावे लिहली आहेत. याप्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या