
टीआरपी घोटाळ्यात मुंबई क्राईम ब्रँचच्या एसआयटीने गेल्या दोन दिवसात अभिषेक कोलवडे आणि आशीष चौधरीच्या मुंबई, ठाणे येथील घर आणि कार्यालयात छापे टाकले. छापे टाकून पोलिसांनी 13 लाख 72 हजार रुपये रोख, 2 हार्ड डिस्क आणि 5 पेन ड्राईव्ह जप्त केले आहेत.
मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळा उघड करून 11 जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात अटक केलेल्या अभिषेक आणि आशिषच्या चौकशीत पोलिसांना काही माहिती मिळाली. त्या माहितीनंतर एसआयटीच्या 6 पथकाने गेल्या दोन दिवसात अभिषेक आणि आशिषच्या मुंबई, ठाणे येथील घर कार्यालयात छापा टाकला. अभिषेकच्या घरातून 11 लाख 72 तर आशिषच्या घरातून 2 लाख रुपये जप्त केले आहे.
अभिषेकला गेल्या वर्षभरापासून काही संशयित चॅनल्सकडून महिन्याला काही पैसे येत. ते पैसे तो उमेश मिश्रा, रामजी वर्मा, दिनेश विश्वकर्माला द्यायचा आणि नंतर त्याचे वाटप व्हायचे.
























































