प्रदूषण रोखण्यासाठी पालिका मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार आहे. यासाठी पालिकेने मागवलेल्या ‘एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट’ला चार स्वदेशी कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र या प्रकल्पासाठी पालिकेने ‘ग्लोबल’ निविदा मागवल्या असल्यामुळे ‘स्वारस्य अभिरुची’साठी आणखी एक आठवडय़ाची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी नियमावली जाहीर केली आहे. 23 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या 27 प्रकारच्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत.

  • हवेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोगही केला जाणार आहे. यासाठी पालिकेने मागवलेल्या स्वारस्य अभिरुची पंपन्यांकडून त्यांचे कृत्रिम पावसाबाबतचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे. यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.