
मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या शैक्षणिक विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या प्रसिद्ध आणि पारंपरिक अभ्यासक्रमांसह नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यापीठानेही असे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे उदयोन्मुख क्षेत्रातील संधीचे नवीन दालन खुले होणार आहे.
विद्यापीठाने आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, डेटा एनॅलिटिक्स, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
वरील सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशील मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखा
परफार्ंमग आर्ट्स मध्ये मास्टर्स, हिंदुस्थानी शास्त्राrय गायन, लोककला, रंगभूमी (नाटक) एम.ए. इन डॉ. आंबेडकर स्टडीज, विकास अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण अभ्यास, नेतृत्व अध्ययन, हिंदू स्टडीज आणि कीर्तनशास्त्र, एम.एस.डब्ल्यू.- सामाजिक कार्यातील पदव्युत्तर पदवी ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी.
पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम
ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी, कायदा व फॉरेन्सिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, आंतरराष्ट्रीय धोरण व रणनीती अभ्यास, टेम्पल मॅनेजमेंट, प्लेबॅक सिंगिंग अँड स्टेज परफॉर्मन्स.