
सामना प्रतिनिधी । मुंबई
एमफिल आणि पीएचडी प्रवेश परीक्षा आता ऑनलाइन होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमानुसार मुंबई विद्यापीठाने ही सुधारित नियमावली जाहीर केली आहे. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी एमफिल आणि पीएचडीसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेल्या ‘कुलगुरू निर्देशिके’ला मान्यता दिली.
एमफिल आणि पीएचडीसंदर्भातील ही सुधारित नियमावली १५ जूनपासून लागू करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये प्रवेश परीक्षांपासून पदवी जाहीर होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश असेल. या परीक्षांचे अर्ज व शुल्कदेखील ऑनलाइन स्वीकारले जाणार आहे. ही परीक्षा वर्षातून एकदा होणार असून जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्याला विद्यापीठाकडून उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राचा कालावधी तीन वर्षांचा असेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
अशी होईल परीक्षा
– ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल.
– एकूण १०० प्रश्न असतील क त्याला १०० गुण असतील
– यामधील दोन पेपरमध्ये पहिला पेपर संशोधन पद्धती व इतर बाबी तर दुसरा पेपर पदव्युत्तर पदकीच्या विषयाकर आधारित असेल.
– या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती संबंधित संशोधन केंद्रावर घेतल्या जातील. तिथे उपलब्ध असलेल्या जागांनुसार संशोधनासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
संशोधनाचा कालावधी
एमफिलसाठी संशोधनाचा कालावधी कमीत कमी दोन सत्र किंवा एक वर्ष व जास्तीत जास्त चार सत्रे किंवा दोन वर्षे असेल तर पीएचडीसाठी हा कालाकधी कमीत कमी तीन वर्षे व जास्तीत जास्त सहा वर्षे असेल, परंतु हा कालावधी दहा वर्षांपेक्षा जास्त नसेल.
























































