विल्सन कॉलेजचा मोजेकमधून वृक्ष वाचवण्याचा संदेश

79

सामना ऑनलाईन। मुंबई

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विल्सन कॉलेजच्या विदयार्थ्यांनी समाजाला ‘होप’ या कार्यक्रमातून हरितक्रांतीचा अनोख्या स्टाईलमध्ये संदेश दिला आहे. आजच्या तरुण पिढीला वृक्षाचे निसर्गाचे महत्व समजावे .यासाठी विल्सनबरोबरच मुंबईतील अनेक कॉलेजेसनी गिरगाव चौपाटीवर मोजेक बनवले. यावेळी मानवी साखळी तयार करत विद्यार्थ्यांनी वृक्ष जगवण्याचा संदेश दिला.

यात तब्बल ४० कॉलेजेस सहभाग घेतला होता. यावेळी मुंबईत हरित क्रांती करण्याची शपथ सर्व विद्यार्ध्यांनी घेतली. कार्यक्रमाची रुपरेषा विल्सनच्या डॉक्टर जुलैका होमावजीर यांनी आखली होती.

आपली प्रतिक्रिया द्या