
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन एका नातवाने आपल्या बेपत्ता झालेल्या आजीचा शोध घेतला आहे. नातवाने 79 आजीच्या माळेमध्ये छोटासा जीपीएस ट्रॅकर लावला होता. त्यामुळे हरवलेल्या आजीचा त्याला शोध घेता आला.
दक्षिण मुंबईच्या एक महिला संध्याकाळी फेरफटका मारत असताना अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे त्यांच्या घरचे प्रचंड काळजीत पडले. मात्र नातवाने अनोखी शक्कल लढवत आपल्या आजीचा शोध घेतला आहे. त्याने आजीच्या माळेला जीपीएस ट्रॅकर लावला होता. त्याच्या माध्यमातून त्याने आजीचा शोध घेतला. मात्र ट्रॅकरच्या डिटेल्स शेअर केलेले नाही.
3 डिसेंबर रोजी सायरा बी ताजुद्दीन मुल्ला यांना शिवडी परिसरात एका दुचाकीने धडक दिली. त्यानंतर स्थानीक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्या बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबिय चिंतेत पडले. तेव्हा त्यांचा नातू मोहम्मद वासिम अय्यूब मुल्लाने तिच्या माळेला लावलेल्या जीपीएस डिवाइसची मदत घेतली. जीपीएसचे लोकेशन परळच्या केईएम रुग्णालय दाखवत होते. त्याच्या घरापासून ते पाच किमी अंतरावर आहे. त्यानंतर त्या वृद्ध महिलेचे संपूर्ण कुटुंब तिच्याजवळ पोहोचले आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालय रेफर करण्यात आले.

























































