
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डॉ. अगरवाल्ज रुग्णालयाच्यावतीने 31 मार्च पर्यंत मोफत नेत्र तपासणीचे आयोजन महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये करण्यात आले आहे. डोळ्यांशी संबंधित वाही विशिष्ट आजार आणि विकारांच्या तपासणीसाठी रूग्णालयाने विशेष व्यवस्था केलेली आहे. सामान्यतः महिलांमध्ये डोळ्यांचे आजार आणि विकारांचा टक्वा अधिक जाणवतो. तसेच अलीकडच्या काळात त्यात वाढ झालेली आहे. त्यात मॅक्युलर डिजनरेशन, ऑक्युलर मॅनीफेस्टेशन ऑफ ऑटोईम्युन डिसीज, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, ग्लोकोमा, दृष्टी अधू असणे, थायरॉईड संलग्न डोळ्यांचे विकार आणि रिप्रेक्टीव्ह एरर्स असे वयोमानानुसार उद्भवणाऱ्या समस्यांचा समावेश असतो. महिलांमधील नेत्र आजारांची वाढती जोखीम लक्षात घेता सजगता सत्राचे आयोजन रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहे, असे अगरवाल्ज आय हॉस्पिटल, मुंबईच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. कविता राव यांनी स्पष्ट केले. नोंदणीकरिता संपर्क 8879875344.


























































