सीए परीक्षेत मुंबईचा राजन काबरा पहिला; फाऊंडेशन, इंटरमीडिएट, परीक्षेचा निकाल जाहीर

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे 2025 मध्ये घेतलेल्या फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंतिम परीक्षेत देशातून मुंबईचा राजन काबरा पहिला आला. त्याने 600 पैकी 516 गुण मिळवले. कोलकाताच्या निशिता बोथ्रा हिने 503 गुण तर मुंबईच्या मानव शहा याने 493 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. दरम्यान, फाऊंडेशन परीक्षेत गाझियाबादची वृंदा अगरवाल तर इंटरमीडिएट परीक्षेत मुंबईची दिशा गोखरू पहिली आली आहे.

फाऊंडेशनमध्येही मुंबईची मुले चमकली 

सीए फाऊंडेशन ही परीक्षा देशभरातून 551 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून 82 हजार 662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. फाऊंडेशन परीक्षेत देशातून गाझियाबादमधील वृंदा अगरवाल 400 पैकी 362 गुण मिळवून अव्वल आली आहे. मुंबईच्या यज्ञेश नारकरने 440 पैकी 359 गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला तर ठाण्याच्या शार्दुल विचारे याने 358 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.