मुरली विजयचा शतकी सराव लोकेश राहुलही आला फॉर्मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । सिडनी 

हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या 6 डिसेंबरपासून ऍडलेड येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होत असून त्याआधी सिडनी येथे एकमेव चारदिवसीय सराव सामन्यात हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आपल्या खेळाची चाचपणी केली. मुरली विजय व लोकेश राहुल या दाक्षिणात्य फलंदाजांनी दुसर्‍या डावात अनुक्रमे 129 व 62 धावा करताना महत्त्वाचा सराव केला, मात्र हिंदुस्थानच्या गोलंदाजांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. त्यांनी पहिल्या डावात 544 धावा तडकावल्या. अखेर ही लढत ड्रॉच राहिली. पहिल्या डावात हॅरी निल्सेनने 100 धावांची आणि ऍरोन हार्डीने 86 धावांची खेळी साकारली. मुरली विजयने 5 षटकार व 16 चौकारांसह 129 धावांची शानदार खेळी साकारली. तसेच लोकेश राहुलने 1 षटकार व 8 चौकारांसह 62 धावा तडकावल्या.