‘साजन’फेम संगीतकार श्रवण यांचे निधन 

नव्वदीच्या दशकात  बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱया नदीम-श्रवण या लोकप्रिय संगीतकार जोडीतील श्रवण राठोड यांचे आज रात्री निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

 नदीम-श्रवण या संगीतकार जोडगोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपरहिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या