किरकोळ कारणावरून एकावर गोळीबार नगर रस्त्यावरील घटनेने परिसर हादरला

452

किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील खांदवेनगर परिसरात घडली आहे. आरोपींनी झाडलेल्या दोन गोळ्यापैकी एक गोळी संबंधित नागरिकाच्या डोक्याजवळून गेल्याने ते जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. मधुकर खांदवे (वय 54) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे व आरोपीमध्ये रस्त्यावरून वाद होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होते. बुधवारी रात्री त्याचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. त्यानंतर मधुकर नगर रस्त्यावर खांदवे नगर येथे थांबले असताना तेथे आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्याने त्यातील एक गोळी मधुकर यांच्या डोक्याला लागली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या