नगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा ‘अ’ पोटनिवडणूक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगरपालिकेतील रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सहा अ या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाले असून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

नगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये शिवसेनेच्या सारिका भुतकर या निवडून आलेल्या होत्या. सदरचा प्रभाग हा अनुसूचित जमाती महिला याकरता राखीव आहे .भुतकर यांनी वैधता प्रमाणपत्र हे मुदतीमध्ये सादर न केल्यामुळे मागील महिन्यामध्ये त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. यासंदर्भातला अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतर या प्रभागांमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी राज्यातील महानगरपालिकेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये नगरच्या प्रभाग क्रमांक सहा निवडणूक जाहीर केले आहे. निवडणूक कार्यक्रमांमध्ये दिनांक 14 जानेवारी रोजी कार्यक्रमाची सुचना जाहीर करणे, दिनांक 14 ते 21 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दिनांक 22 रोजी अर्जाची छाननी, दी. 25 रोजी निवडणूक चिन्ह दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मतदान व सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे