जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन

439

वादग्रस्त ठरलेल्या नगर जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला, विशेष म्हणजे शुक्रवारी दुसऱ्या दिवशी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला, दरम्यान, जिल्ह्यातील सर्व क्रिडा संघटनांनी मागील महिन्यामध्ये राज्यपालांना भेटून क्रिडा खात्याच्या संदर्भातील सर्व प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी केलेली असताना नावंदे यांची पुन्हा नियुक्ती कशी काय होते असा सवाल करण्यात येत आहे.

कविता नावंदे यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी पदाचा आठ महिन्यांपासून पदभार स्वीकारला होता, त्यानंतर त्यांनी जिल्हा क्रिडा संकुलामध्ये अनेक धडाकेबाज निर्णय घेतले, खेळाडू व क्रिडा संघटनांना क्रिडासंकुलात मैदान मिळण्यासाठी पैसे देणे यासह जाचक अटी घातल्या होत्या, विशेष म्हणजे या क्रिडा संकुलामध्ये रक्कम भरल्या शिवाय कुणालाही प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेतल्यानंतर टीकेची झोड उठली होती, यानंतर जिल्ह्यातील बहुतांश क्रीडा संघटना एकवटल्या होत्या, त्यांनी कविता नावंदे यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी केली होती व त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तत्कालीन मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन केली होती ,त्या वेळेला सरकारने नावंदे यांची बदली अन्य ठिकाणी केली होती.

या दरम्यानच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध संघटनांनी प्रा, सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांकडे पत्र देऊन कविता नावंदे यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती. शासनाकडून चौकशी न करताच दोन दिवसापूर्वी राज्य शासनाने कविता नावंदे यांची तात्काळ नगरचे जिल्हा क्रिडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली, तर दुसरीकडे याच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सर्वजण सामूहिक रजेवर आहेत ,त्यामुळे कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या