नागपाडा येथील बोगस मोबाईल बॅटऱ्यांचा गोरखधंदा उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध नामांकित मोबाईल कंपन्यांच्या नावाने बनावट बॅटऱया विक्रीचा कामाठीपुरा येथे सुरू असलेला गोरखधंदा गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात विविध कंपन्यांच्या नावाने साठा केलेला मोबाईल पंपन्यांच्या एक कोटी 70 लाख 44 हजार किमतीच्या बॅटऱया व अन्य साहित्य जप्त केले.

नागपाडा येथील लकडाबाजार परिसरात असलेल्या तारवाडी चाळीतल्या गाळ्यात नामांकित मोबाईल पंपन्यांच्या नावाने बनावट बॅटऱया विकल्या जात असल्याची खबर युनिट-5 चे प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर यांना मिळाली. त्यानुसार नायर यांनी त्यांच्या पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. त्याचवेळी तेथे विविध नामांकित मोबाईल पंपन्यांच्या जवळपास एक कोटी 70 लाख 44 हजार रुपये किमतीच्या बॅटऱया व अन्य साहित्य सापडले. हा काळाबाजार करणाऱया दोघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. चौकशीत अटक आरोपी हे मोबाईलच्या बनावट बॅटऱया व हेडपह्न गुजरात, मध्य प्रदेश व इतर राज्यांत बनावट बॅटऱया या ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

अॅपल कंपनीचे बनावट अॅक्सेसेरीज जप्त

अॅपल मोबाईल कंपनीच्या नावाने बनावट अॅक्सेसेरीज विकणाऱया व्ही. पी. रोड येथील एका दुकानावर आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत 28 लाखांचे बोगस अॅक्सेसेरीज जप्त करण्यात आले. गिरगावातील तबेला चाळीत असलेल्या एका गाळ्यात अॅपल मोबाईल कंपनीच्या नावाने विविध बनावट अॅक्सेसेरीजचा साठा केला असल्याची तक्रार आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाकडे आली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटिल यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तेथे 28 लाख 16 हजार किमतीचा अॅपल मोबाईल कंपनीचा विविध अॅक्सेसेरीजचा साठा आढळला. हा साठा जप्त करून पोलिसांनी हा काळाबाजार करणाऱया पुराराम पुरोहित याला अटक केली.