
नागपूर जिल्ह्यात काही काळापासून कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु आता पुन्हा बाधितांच्या संख्येने उच्चांकी संख्या गाठली असून शनिवारी जिह्यात गेल्या अनेक दिवसांनंतर रुग्णसंख्येने 486 टप्पा गाठला आहे. तर कोरोनामुक्तांचे प्रमाण घटून आता सक्रिय रुग्णांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनामध्ये चिंतेते वातावरण पसरले आहे.
काल नागपुरात 319 बाधित रुग्ण आढळले होते. आज जिल्ह्यात 4719 चाचण्या करण्यात आल्या. यापैकी शहरातून 4064, ग्रामीणमधून 655 तर इतर जिह्यातील 2 असे नव्याने 319 बाधितांची नोंद करण्यात आली.
यासोबतच जिह्यातील एपूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 38 हजार 300 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ग्रामीणमधील शहर व इतर जिह्यांतील प्रत्येकी दोन असे 5 जण कोरोनामुळे दगावले.
यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या 4224 वर गेली आहे. आज दिवसभरात बाधितांच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजेच केवळ 266 जण ठणठणीत होऊन घरी परतले.
यासोबतच एकूण कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 30 हजार 227 वर गेली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून 94.16 टक्क्यांवर पोहोचले आहे. सद्यस्थितीत शहरातील 3065 तर ग्रामीणचे 784 असे 4506 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 2360 जणांना पुठलीही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत.


























































