द्या खोके, भूखंड ओके!! मुख्यमंत्र्यांविरोधात तुफान घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्र्यांच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळात आजही जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.

भूखंड लिहिलेले श्रीखंडाचे डबे उंचावून धरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते म्हणजेच अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, नाना पटोले, रोहित पवार, अंबादास दानवे, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षांचे बहुतांश आमदार या घोषणाबाजीत सहभागी झाले होते.