नागपूर विद्यापीठात संघाचा इतिहास

13


सामना प्रतिनिधी। नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) इतिहास आता द्वितीय वर्ष बीएचे इतिहासाचे विद्यार्थी अभ्यासणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने ‘संघाचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान’ या प्रकरणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच संघाबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाने नुकतेच नवीन अभ्यासक्रम तयार केले. त्यात इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. पदवी दुसऱया वर्षाच्या हिंदुस्थानचा इतिहास 1885 ते 1947 या कालखंडाच्या तिसऱया घटकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र निर्माणातील भूमिका’ या विषयाचा समावेश केला आहे. या विषयात संघ स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात झालेल्या विविध घटना, घडामोडी यांचा उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपण आजपर्यंत अनेक संघटनांच्या इतिहासाची माहिती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचवली आहे. संघाचा इतिहासही विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने अभ्यास मंडळाने निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या