
देवदर्शनासाठी गणपती पुळे येथे जाणाऱ्या एका कारला आज पहाटे हिंगणघाट येथे भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.
उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी येथील काही तरुण देवदर्शनासाठी गणपती पुळे येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या बोलेरो गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटना स्थळी धाव घेतली. जखमींना उपचारा करीता रुग्णालयात भरती केले आहे.


































































