
सामना प्रतिनिधी । गडचिरोली
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये नक्षलावाद्यांनी घडवून आणलेल्या भू-सुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. तसेच या हल्ल्यात वाहन चालकाचाही मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या गाडीला निशाणा करून स्फोट घडवून आणला. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावांची यादी ‘दै. सामना’च्या हाती लागली आहे.
शहीद झालेल्या जवानांच्या नावं –
1) पोलीस शिपाई साहुदास बाजीराव मडावी रा. चिखली ता. कुरखेडा,
2) प्रमोद महादेवराव भोयर, देसाईंगज
3) राजु नारायण गायकवाड मेहकर जि. बुलढाणा
4) किशोर यशवंत बोबाटें आरमोरी जि. गडचिरोली
5) संतोष देविदास चव्हाण ब्राम्हणवाडा ता. औंध जि. हिंगोली
6) सर्जेराव एकनाथ खरडे आळंद ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा
7) दयानंद ताम्रध्वज शहारे, रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
8) भुपेश पांडुरंग वालोदे, लाखनी जि. भंडारा
9) आरिफ तौशिब शेख रा. पाटोदा जि. बिड
10) योगाजी सिताराम हलामी रा. मोहगाव ता. कुरखेडा
11) पुरणशहा प्रतापशहा दुगा, भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली
12) लक्ष्मण केशव कोडापे, रा. बेंगलखेडा ता. कुरखेडा
13) अमृत प्रभुदास भदाडे रा. चिंचघाट ता. कुही जि. नागपूर
14) अग्रमान बक्षी रहाटे, रा. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ
15) नितीन तिलकचंद घोडमारे रा. कुंभाली ता. साकोली जि. भंडारा
16) दादुभाऊ सिंगनाथ, वाहन चालक, रा. कुरखेडा



























































