भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या! नाना पटोलेंनी घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. ‘‘भाजपचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरू आहे?’’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  यांनी विचारला.

wआमदार भास्कर जाधव सुधीर मुनगंटीवार यांच्या मुद्दय़ावर कामकाज प्रक्रिया समजवून सांगत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले यांनी घेतला. याची माहिती देताना नाना पटोले म्हणाले, सभागृहाचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे.