नांदेड – कोरोना बाधितांचा आकडा 8 हजार पार, आज 362 अहवाल पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू संसर्गामुळे आज सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृत्यूची संख्या २५७ वर पोहोचली आहे. आज ३६२ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८२१२ एवढी झाली आहे.

आज नाटकरगल्ली देगलूर येथील ४६ वर्षीय पुरुष, विनायकनगर, नांदेड येथील ६१ वर्षीय पुरुष, विष्णूपुरी नांदेड येथील ७० वर्षीय पुरुष, पिवळीगिरणी परिसर नांदेड येथील ७२ वर्षीय पुरुष, लोखंडवाडी, किनवट येथील ५० वर्षीय पुरुष, गणराज प्लाझा नांदेड येथील ५६ वर्षीय पुरुष अशा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. आज १३८१ स्वॅबच्या अहवालापैकी ९६६ जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले असून ३६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या ८२१२ एवढी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या ३६२ पॉझिटीव्ह अहवालात नांदेड मनपा क्षेत्र १६५, किनवट १६, भोकर ५, लोहा १५, नायगाव २४, उमरी २०, धर्माबाद ११, नांदेड ग्रामीण २६, अर्धापूर २, हदगाव १६, देगलूर ४, मुखेड ११, हिंगोली ३, हिमायतनगर ४, परभणी १, यवतमाळ २, मुदखेड ४, लातूर २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज २०२ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ५२०३ एवढी झाली आहे. आज वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून २६९८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर यातील २७१ रुग्ण गंभीर स्वरुपाचे आहेत.