स्थानिक गुन्हा शाखेत 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-police2

सामना प्रतिनिधी । नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेत 5 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कारभारीपद पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांना दिले आहे. किनवट येथे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांना पाठवले आहे. अश्या एकूण 3 पोलीस निरीक्षक,1 सहायक पोलीस निरीक्षक आणि 1 पोलीस उप निरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

29 ऑगस्ट 2018 रोजी किनवट शहरात एका महिलेचा खून झाला आणि तो गुन्हा दाखल करणे आणि त्याचा स्पेशल रिपोर्ट पाठवणे याबाबत झालेला निष्काळजीपणा किनवटचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना भोवला. त्यांना अगोदर तोंडी आदेशाने नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे जवळपास 10 महिन्यांपासून नियंत्रण कक्षात काम करत होते. यासंदर्भाने त्यांनी मॅट न्यायालयात दाद मागितली होती. तेथे त्यांना यश आले नाही. काही दिवसांपूर्वीच दिलीप तिडके यांची बीड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात बदली झाली होती.स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते.

संजय जाधव यांनी खऱ्या दावेदाराला न्याय देत पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांना स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी बनवले आहे.पूर्वीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांना त्यांच्या मूळ सायबर विभागात काम करायचे आहे. सोबतच रिकाम्या असलेल्या किनवट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांना जबाबदारी देण्यात आली आहे. किनवटचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना नियंत्रण कक्षात कायम करण्यात आले आहे.सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांना स्थानिक गुन्हा शाखेतून पोलीस ठाणे उमरी येथे पाठवण्यात आले आहे.तसेच नियंत्रण कक्षातील पोलीस उप निरीक्षक व्यंकट रतनबुवा भारती यांना पोलीस ठाणे इतवारा येथे पाठवण्यात आले आहे.