४० लाख कर्जाची लालूच दाखवून ७ लाखांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

समाजकल्याण खात्याचे ५० टक्के अनुदान असलेले ४० लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून ७ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना नांदेडमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तेलंगणाच्या निजामाबाद येथील सेवानिवृत्त कर्मचारी सय्यद साजीद अली सजय्द दस्तगिर अली (६०) यांची नांदेडच्या शादुल्ला हॉटेलजवळ २०१६ मध्ये  आरोपी शेख जावेद शेख इब्राहिम (४३), अब्दुल रज्जाक मेमन कच्छी आणि शेख नजीर शेख बशीर (टिपुसुलतान चौक, मिर्झा गल्ली वसमत, जि. हिंगोली) यांच्याशी भेट झाली. तेव्हा बोलताना या तिघांनी आमची समाजकल्याण विभागात चांगली ओळख असल्याची बतावणी केली. ५० टक्के म्हणजे २० लाखांचे अनुदान असलेले ४० लाखांचे कर्ज मिळवून देण्याची लालूच त्यांनी सय्यद साजीद अली यांना दाखवली. त्यासाठीचा खर्च म्हणून २०१६-१७ या एका वर्षाच्या कालखंडात या तिघांनी साजीद अलीकडून ७ लाख रुपये उकळले. काही दिवसानंतर तिघांनी साजीद अलीला  ४० लाखांचे कर्ज मंजूर झालेले पत्र दिले आणि सोबतच एस.बी.एस. बँकेचे दोन डी.डी.च्या झेरॉक्स प्रती दिल्या. या पत्राची आणि डी.डी.ची शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर साजीद अलीने तक्रार दिली. पोलिसांनी काहीच केले नाही म्हणून न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर २० जानेवारी २०१८ रोजी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वसमत येथून तिघा आरोपींना अटक केली