अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान मोदिंचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकार कोणत्याही अडथळ्याविना अविश्वासदर्शक ठराव जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“आजचा दिवस संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. माझे सहकारी खासदार या प्रसंगाला सामोरे जातील. एक सखोल आणि अडथळ्याविना चर्चा करतील याची मला खात्री आहे, संपूर्ण देश आपल्याकडे पाहतोय”

तेलगू देसमसह इतर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकसभेत सामोरे जाणार आहे. मोदी सरकारसाठी ही अग्निपरीक्षाच ठरणार आहे. टीडीपीने दाखल केलेल्या या अविश्वास ठरावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा सामना आज रंगणार आहे.