डायरेक्टर बरोबर ‘कॉम्प्रमाईज’ न केल्याने कमी चित्रपट मिळाले- नरगिस फाकरी

1327
सद्या मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री नर्गिस फाकरीचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. तिचे वडिल पाकिस्तानी असून आई अमेरिकन आहे. त्यामुळे नर्गिसकडे अमेरिकेच नागरिकत्व आहे.

बॉलीवूड आणि कास्टींग काऊच हा तसा जुनाच वाद. या वादात आता अभिनेत्री नरगिस फाकरी हीने उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी तिने करियरबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी डायरेक्टर बरोबर ‘कॉम्प्रमाईज’ न केल्याने आपल्याला कमी चित्रपट मिळाले. त्याच्याबरोबर शय्यासोबत न केल्याने व न्यूड सीन देण्यास नकार दिल्यानेच मला फार कामं मिळाली नाहीत असं नरगिसने सांगितल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नरगिसला म्हणावे तेवढे अपेक्षित यश मिळाले नाही.अक्षय कुमारबरोबरचा ‘हाऊसफुल फ्रेंचाईजी’ आणि जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’नंतर ती फार दिसली नाही. यावर तिने नुकताच खळबळजनक खुलासा केला आहे. ‘ब्रिटनी डी ला मॉरा’ या  टॉक शोमध्ये बोलताना तिने सांगितलं की ‘प्लेबॉय’ सारख्या मोठ्या ब्रँडमध्ये काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी आनंदात होते. पण शुटींगदरम्यान डायरेक्टरने तिला कॅमेरासमोर न्यूड होऊन पोझ द्यायला सांगितले. तिने यास नकार दिला. यामुळे तिला काढून टाकण्यात आले. नंतर नरगिस बॉलीवूडमध्ये आली. पण येथेही तोच अनुभव आला. यामुळे आपल्याला फार चित्रपटात काम मिळाले नाही असे नरगिसने सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या