नाशकात रविवारी सहा आकस्मिक मृत्यू

death

शहर व परिसरात छातीत दुखून, श्वास घेण्यास त्रास होऊन नागरिक मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी याच कारणांमुळे सहा जणांनी आपला जीव गमावला. लेखानगरच्या कलावती जयचंद निकम (44) यांना घरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शनिवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्याने पंचवटीतील अमृतधाम येथील मनोहर परशुराम अहिरराव (58), बिडी कामगार नगरच्या वेणूबाई शंकर भोईर (80), विनोदराव उद्धवराव व्यवहारे (48), तर डीजीपीनगर-2 येथील विजय पंडित दास्ताने (70) यांचा मृत्यू झाला. अशक्तपणा व चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने सावतानगरच्या शोभाबाई केशवराव उदासी (78) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या