नाशिक पदवीधर मतदार संघ – शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांचे 31 अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

गुरुवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये नितीन नारायण सरोदे,नाशिक व संजय एकनाथ माळी,जळगाव, राजेंद्र दौलत निकम, नाशिक यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार, नाशिक यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. रतन कचरु बनसोडे, नाशिक यांनी वंचित बहुजन आघाडीतून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे,पनवेल,जि.रायगड यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र अर्ज सादर केले आहेत. पोपटराव सीताराम बनकर,नगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. बाळासाहेब घोरपडे,नाशिक यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. अविनाश महादू माळी, नंदूरबार, इरफान मोहमंद इसाक,नाशिक ,सुनिल शिवाजी उदमळे,नगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

सुभाष राजाराम जंगले,नगर व अमोल बाबासाहेब खाडे, नगर यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच सत्यजित सुधीर तांबे, नगर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शरद मंगा तायडे, नाशिक यांनी बहुजन समाज पार्टी, नाशिक या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत.

राजेंद्र मधुकर भावसार,धुळे, यशवंत केशव साळवे,नाशिक, धनराज देविदास विसपुते,धुळे, छगन भिकाजी पानसरे, नगर, अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव,नगर यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. 10, 11 व 12 जानेवारी 2023 या तीन दिवसात 29 उमेदवारांनी एकूण 44 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.