नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर झळकले अभिनेत्रीचे बोल्ड फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मीडियाच्या जगात तंत्रज्ञान जितकं फायदेशीर तितकं तापदायकसुद्धा ठरण्याची शक्यता वाढली आहे. आणि जर त्यात मानवी चुकांची भर पडली तर मग विचारायची सोयच नाही. याचाच प्रत्यय नॅशनल स्टॉक एक्सचेंजला आला आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही संस्था शेअर विक्रीसंबंधित देशातील महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे साहजिकच देशभरातील शेअर होल्डर्स या संस्थेशी निगडीत घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. शनिवारी मात्र या शेअर होल्डर्सना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ट्विटर हँडलवर झळकलेल्या एका पोस्टमुळे चांगलाच धक्का बसला.

या पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय हिचे फोटो झळकले होते. काळ्या रंगाचा टॉप आणि मेटॅलिक स्कर्ट असा पेहराव केलेल्या मौनीने नुकतंच एक फोटो शूट केलं होतं. ते फोटो त्याच फोटोशूटवरून उचलले होते. त्या खाली चक्क Soaring Saturday temperature high… @RoyMouni looks breathtaking’ अशी कॅप्शन देऊन मौनीला त्यात टॅगही करण्यात आलं होतं.

nse-mouni-rouy

हा घोळ लक्षात आल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने हे ट्वीट डीलिट केलं. आधी सर्वांना वाटलं की, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं ट्विटर हँडल हॅक झालं. पण त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने पुन्हा नवीन ट्वीट केलं.

त्यात ‘हे फोटो चुकून पोस्ट झाले आहेत. अकाउंट हॅक झालं नसून ही मानवी चूक आहे. आम्ही त्याबद्दल क्षमा मागतो, असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पण तोवर उशीर झाला होता.


View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

त्या आधीच हे फोटो असलेल्या त्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल करण्यात आले होते. नेटकऱ्यांनी त्या फोटोवरून नॅशनल स्टॉक एक्सचेंजची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अनेकांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजला त्यांचा सोशल मीडिया हाताळणारी कंपनी बदलण्याचाही सल्ला दिला.