
केंद्र सरकारने जून महिन्यात कोरोना प्रतिबंधित 12 कोटी लस पुरवठा करण्याची घोषणा केली होती. मात्र, दहा दिवस उलटून गेले तरी केंद्र सरकारने आपल्या घोषणेची पूर्तता केलेली नाही. केंद्र सरकार लस उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.
केंद्र सरकार कोरोना लसीकरणाच्या माहितीचा डाटा सार्वजनिक करू नका असे राज्यांना सांगत आहे.मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. हे लोकांपासून का लपवायचे असा सवालही मलिक यांनी केला.
किती लस पुरवठा झाला आणि किती लोकांचे लसीकरण करण्यात आले याची माहिती केंद्र सरकारने दर आठवडय़ाला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी, असेही मलिक म्हणाले.


























































