नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा पुढे ढकलली. किडनी विकाराने त्रस्त असलेले मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी दाद मागितली आहे. तथापि, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अन्य प्रकरणांच्या व्यस्ततेमुळे मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविली. पुढील सुनावणी 6 जूनला होईल.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यामुळे विशेष वैद्यकीय काळजी घेण्याची गरज असल्याचा दावा करीत मलिक यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.