
ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने दिलेला निकाल दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आज रद्द करण्यात आला. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे. दरम्यान, खटला पूर्ण होईपर्यंत वानखेडेंविरुद्ध कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी आज खंडपीठाला दिली.
एकलपीठाचा निर्णय सहमतीने रद्द करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर आज खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयात वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ काwन्सिल बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी एकलपीठाने दिलेला आदेश रद्द करण्यासाठी आपले अशील ज्ञानदेव वानखेडे यांनी सहमती दर्शवली आहे. खंडपीठाने याची दखल घेत एकलपीठाचा आदेश रद्द केला.

























































