
सामना ऑनलाईन। मुंबई
अल्पावधीतच बॉलीवूड दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा हात फ्रॅक्चर झालायं. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी नवाजुद्दीन कानपूरला गेला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी एकाने त्याची मान पकडली व नंतर त्याचा हात इतक्या जोरात खेचला की त्याचा हातच फ्रॅक्चरच झाला.
नवाजुद्दीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ त्याच्या कानपूर भेटीचा आहे. कानपूर येथे एक कार्यक्रम आटोपून नवाजुद्दीन हॉटेलकडे येत असताना चाहत्यांनी त्याला गराडा घातला. त्याचवेळी गर्दीतल्या एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी नवाजुद्दीनचा गळा पकडला व त्याचा हात खेचत त्याला आपल्या दिशेने खेचले. या खेचाखेचीत नवाजचा हातच फ्रॅक्चर झाला. माझा हात फॅक्चर तर झालाय. स्नायूही दुखावलेत. पण त्यात काय एवढं हे तर चाहत्यांचे प्रेम आहे. प्रेम व्यक्त करण्याची त्याची ती स्टाईल आहे . असं उत्तर देत नवाजने चाहत्याचे आभारही व्यक्त केले आहेत. यावर्षी ‘ठाकरे’ चित्रपटापासून कामाची सुरवात करणाऱ्या नवाजला मोठया पडदयावर बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तसेच नवाज सैके्रेड गेम्सच्या नवीन सिझनमध्येही लवकरच दिसणार आहे.


























































