हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गडचिरोली

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सरकार विरोधात बॅनरबाजी केली आहे. गडचिरोलीत दादापूर गावासह ठिकठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावून सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जल-जंगल-जमीनीवर जनतेचा अधिकार असून त्यासाठी बलिदान देण्याचेही आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.

गेल्या वर्षी कसनासूरच्या जंगलात शिघ्र कृती दलाने केलेल्या कारवाईत 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवल्याचे बोलले जात आहे. त्यानिमित्त 22 ते 28 एप्रिलदरम्यान नक्षलवाद्यांनी विशेष सप्ताहाचे आयोजन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय हिंदूराष्ट्र निर्मितीचे स्वप्न उद्ध्वस्त करून नव जनवादी देश निर्माण करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी बॅनर लावून केले आहे.