स्वतःच लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात मारला गेला नक्षलवादी, शरीराच्या झाल्या चिंधड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडमध्ये एका नक्षलवाद्याने बॉम्ब लावला होता. या बॉम्बचा स्फोट होऊन त्या नक्षलवाद्याचा अक्षरशः चिंधड्या झाल्या आहेत. या घटनेत अजून दोन नक्षलवादी जखमी झाले आहेत.

नक्षलवाद्यांनी खुद्द ही माहिती दिली आहे. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये नक्षलवाद्यांनी काही पत्रकं  आणि पोस्टर लावले होते. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सैन्यावर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी बॉम्ब लावला होता. बॉम्ब लावताना भीषण स्फोट झाला आणि एक नक्षलवादी जागीच ठार झाला. तसेच दोन नक्षलवादी जखमी झाले आहेत.

ज्या भागात स्फोट झाला होता. त्या भागात नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी बॉम्ब लावले होते. हा स्फोट झाल्यानंतर त्यांनी हे बॉम्ब काढून टाकले. त्यामुळे या भागात मोठ मोठे खड्डे दिसत होते. या जागेपासून बीएसफचा तळ काही अंतरावरच आहे.  अनेक वेळा जवान आजूबाच्या जागेवर आराम करण्यासाठी जातात. त्यांना लक्ष्य करण्यासाठीच नक्षलवाद्यांनी इथे बॉम्ब लावले होते. पण अशा प्रकारे बॉम्ब लावणे त्यांच्याच जिवावर उलटले आहे.