घनसावंगीत राष्ट्रवादी नगरसेवकासह असंख्य समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

दांडगा जनसंपर्क असलेले घनसावंगी येथील विद्यमान नगरसेवक शेख मुजाहेद अली खान यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे घनसावंगी शहरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याने मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या