राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp president sharad-pawar

सामना प्रतिनिधी । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. हे अस्तित्व कायमच ठेवणार त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. विलीनीकरणाच्या चर्चांबाबत कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकीतील पराभव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती.

  • विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिकाही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
  • कर्नाटकमधील 28 तारखेला झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर झाला. त्या ठिकाणी काँग्रेस सर्वाधिक ठिकाणी निवडून आली असे जयंत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

उमेदवारांसोबत चर्चा

लोकसभा निवडणुकीतील विजयी तसेच पराभूत उमेदवारांसोबत शरद पवार यांनी व्यक्तिशः चर्चा केली. वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेचा नेमका काय प्रभाव पडला याचीही माहिती पवारांनी जाणून घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचाही सत्कार केला.