
‘मी पुन्हा येईन…’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची भीती आम्हाला नाही. त्यांच्या त्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असायला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप-शिंदे गटाला लगावला.
ते पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला ढकलून स्वत: बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 जणांनी केली पाहिजे, असे पाटील म्हणाले.
त्या खुर्चीत ते परत आले नाहीत – भुजबळ
देवेंद्र फडणवीस मागच्या वेळी ज्या खुर्चीत मी परत येईन म्हणाले होते त्या खुर्चीत ते परत आले नाहीत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी चंदगड येथे केलेल्या वक्तव्यावरून केली.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हालादेखील माहीत आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिह्यातील चंदगडमध्ये म्हणाले होते.
























































