
साखर उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या ब्राझील, थायलंड यासारख्या देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने परदेशातील साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. साखरेच्या बाजारातील ही तफावत लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने साखर निर्यातीला परवानगी द्यायला हवी होती. मात्र शेतकऱ्यांच्या हिताची जाण नसलेल्या सरकारने साखर निर्यातीला बंदी घातली. साखरेप्रमाणेच कांदा निर्यातीला बंदी घालून कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून सरकारने वंचित ठेवले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता त्यांना उद्ध्वस्त करण्याचे धोरण राबविणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत खडय़ासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी शरद पवार बोलत होते.
राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमतं – रोहित पवार
राज ठाकरे यांचे शनिवारच्या सभेतील अर्धे भाषण इतर पक्षांच्या प्रभावाखाली होते की काय, अशी शंका येण्यासारखे होते. त्यांना मिमिक्रीशिवाय काय जमते? मिमिक्री करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा टोला यावेळी आमदार रोहित पवार यांनी लगावला.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

























































