राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चाकण

जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चाकण नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली, अशी माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. राहुल किसन कांडगे (रा. चाकण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कांडगेने पीडित महिलेच्या पतीकडे असलेल्या पैशांच्या कारणावरून व फिर्यादी रहात असलेल्या घराच्या वादावरून पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर शयनगृहात जबरदस्तीने नेत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार करीत आहेत.