बिहारमध्ये NDA ची जागावाटपाची घोषणा केली, भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार

पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. युतीतील कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल याचे चित्र स्पष्ट झाले. भाजप १०१ जागांवर, जेडीयू १०१ जागांवर, चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) २९ जागांवर, उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएम ६ जागांवर आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम ६ जागांवर निवडणूक लढवेल. बिहारमधील भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, बिहारमधील एकूण २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी १२१ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी १२२ जागांसाठी मतदान होईल. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. या निवडणुकीत ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत. यामध्ये ३ कोटी ९२ लाख पुरुष मतदार आणि ३ कोटी ४९ लाख महिला मतदार आहेत.