
मोदी सरकाराच्या कार्यकाळात मोठ्या संख्येने हिंदुस्थानी नागरिकांनी आपलं नागरिकत्व सोडलं आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास ९ लाख हिंदुस्थानी नागरिकांनी आपलं नागरिकत्व सोडलं आहे, असं सरकारने राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या काळात अंदाजे ८,९६,८४३ हिंदुस्थानींनी आपले नागरिकत्व सोडलं आहे.
सरकारच्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, २०२२ नंतर अधिक लोक नागरिकत्व सोडत आहेत. सरकारने खोट्या नोकरीच्या ऑफरमध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांचीही दखल घेतली आहे, ज्या दक्षिण आशियाई देशांमध्ये नोकरीचं आश्वासन देऊन सोशल मीडियाद्वारे हिंदुस्थानी नागरिकांना आमिष दाखवतात.
परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितलं की, या प्रकरणात एकूण ६,७०० हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या लोकांना सायबर गुन्हे आणि इतर फसव्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घोटाळ्याच्या केंद्रांमध्ये काम करण्यास भाग पाडलं जात होतं.




























































